परभणी : एका
स्थानिक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय जाधव यांनी सांगितले की मी
माझ्या आयुष्यात आतापर्यंत तीन निवडणुका लढलो आणि तिन्ही जिंकलो आहे. मी दोन वेळा
आमदार म्हणून निवडून आलो आणि आता खासदार आहे येणाऱ्या निवडणुकात मीच खासदारकी
लढवणार आहे त्यासाठी भाजपा-शिवसेना युती झाली काय नाही काय मीच शिवसेनेचा उमेदवार
असणार आहे. आणि येणारी निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल त्यानंतर निवडणूक
लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. इथे काँग्रेस लढणार की भाजप लढणार याचा
विचार करू नका इथे शिवसेनाच लढणार आणि शिवसेनाच जिंकणार असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. पक्षातील अंतर्गत वादासंबंधी बोलताना ते म्हणाले की राहुल पाटील आणि माझ्यात जे काही गैरसमज होते ते
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूर केले आहेत आता आमच्यात कुठलीही कटुता नाही. पक्ष
म्हटलं की छोटे मोठे वाद होताच राहणार असे बोलून त्यांनी दोघात अजूनही वाद असल्याचे
अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.
















